Aurangabad ACB Trap | घराचा उतारा देण्यासाठी 9 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad ACB Trap | राहत्या घराचा 8 अ चा उतारा देण्यासाठी 9 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्वीकारताना (Accepting Bribe) साजापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. रामकृष्ण बारकू निकम (वय 53) असे लाच घेतना पकडण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत 40 वर्षाच्या व्यक्तीने बुधवारी (दि.11) औरंगाबाद एसीबी कडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या स्वत:च्या राहत्या घराचा नमुना नं 8 अ चा उतारा देण्यासाठी शासकीय टॅक्स पावतीचे 4 हजार व त्या व्यतिरिक्त 5 हजार असे एकूण 9 हजार रुपये लाचेची मागणी निकम यांनी केली. याबाबत तक्रारदार यांनी बुधवारी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार दिली. पथकाने पडताळणी केली असता रामकृष्ण निकम यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना निकम यांना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक पंडित (DySP Pandit) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर (Police Inspector Reshma Saudagar), पोलीस हवालदार राजेंद्र जोशी,
पोलीस नाईक भूषण देसाई, दिगंबर पाठक यांच्या पथकाने केली.

Web Title :- Aurangabad ACB Trap | Village development officer caught in anti-corruption net while accepting bribe of Rs 9 thousands

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलले शिंदे गटातील हे आमदार; म्हणाले…

Sourav Ganguly Statement | सचिन-विराटच्या तुलनेवरील वादावर गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

State Excise Department | अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पुण्यात 25 जणांना न्यायालयाने केला 37 हजारांचा दंड