Aurangabad Accident | औरंगाबाद जिल्ह्यात ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात बहीण भावासह भाचीचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  Aurangabad Accident | कन्नड तालुक्यातील पिशोर-सिल्लोड रस्स्त्यावर ट्रॅक्टर- दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात (Aurangabad Accident) माय लेकीचा जागीच मृत्यू झाला तर उपचारासाठी घेऊन जात भावाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली असून अन्य दोघांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाली भीमा चौगुले (वय २५) ज्योती भीमा चौगुले (वय ३) (दोघी रा.चिंचोली लिंबाजी) असे अपघातात मृत झालेल्या माय लेकीची नावे आहेत.
तर उपचारास नेत असताना सोमनाथ शेषरावर सुरे यांचा मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दसऱ्यासाठी आपली बहिणी बाली चौगुले हिला आणण्यासाठी पिशोर येथील सोमनाथ शेषराव सुरे हे चिंचोली लिंबाजी येथे गेले होते.
दुचाकीवर भाऊ, बहीण, तीन लहान बालकांसह पाच जण जात होते.

 

सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पिशोर सिल्लोड रस्त्यावरील मोन्हंद्री फाट्यावर ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला.
सुरेंच्या घरापासून अवघ्या काही अंतरावरच हा अपघात झाला.
हा अपघात (Aurangabad Accident) इतका भीषण होता की बाली चौगुले आणि ज्योती चौगुले या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांनी घटनास्थळी घाव घेऊन जखमींना पिशोर येथील रुग्णालयात दाखल केले.
मात्र, सोमनाथ, कांती आणि रेणू चौगुले यांना तात्काळ पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात (aurangabad ghati hospital) पाठविले यावेळी वाटेतच सोमनाथता मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून ट्रॅक्टरचा शोध पोलीस घेत आहेत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हरिशकुमार बोराडे (API Harishkumar Borade) करत आहेत.

 

Web Title : Aurangabad Accident | death of sister brother niece in a accident pishori sillod road in aurangabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील 36 वर्षीय विवाहित महिला डॉक्टरसोबत तरुणाचं विकृत कृत्य; नग्न होण्यास भाग पाडलं, अन्…

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 2 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, IMD चा इशारा

Mutual Fund SIP | जर तुम्हाला सतावत असेल निवृत्तीनंतरची चिंता, तर 15 वर्षात सुद्धा जमा करू शकता 5 कोटी रुपये

Diabetes | डायबिटीज रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 6 चूका, आरोग्य होईल बरबाद; जाणून घ्या