जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन नागपूरला परतणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात ! 11 जण जखमी

वाळूज (औरंगाबाद) : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या भाविकांची मिनी बस रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला धडकल्यानं भीषण अपघात झाला. सदर कंटेनर हा नादुरुस्त अवस्थेत होता. यात अपघातात बस अर्धी कापली गेली आहे. या भीषण अपघातात 11 जण जखमी झाले आहेत, यापैकी 3 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद-पुणे महामार्गावरील दहेगाव (बंगला) येथे शुक्रवारी (दि. 5) रोजी पहाटेच्या 3 च्या सुमारास हा अपघात झाला.

नागपूर येतील हर्षदा ठाकरे (10), बंडू ठाकरे (41), रामभाऊ ठाकरे (75), स्नेहा गावंडे (30), अश्विन गावंडे (40), माधव गावंडे (50), विकास म्हस्के (50) असे एकूण 12 भाविक मिनी बसमध्ये होते. जेजुरीहून खंडेरायाचे दर्शन घेऊन ते मिनी बस (एमएच -49 जे, 0634) मधून परत नागपूरला जात होते. ही बस औरंगाबाद-पुणे महामार्गावरील दहेगाव (बंगला) जवळ येताच रोडवर नादुरुस्त असलेल्या कंटेनरला (एमएच-40, बीजी-6677) पाठीमागून जोरात धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की, बस कंटेनर मध्ये घुसली आणि अर्धी कापली गेली. पहाटेची वेळ असल्यानं बस चालकालाही अंदाज आला नाही.

ही घडल्यानंतर हर्षदा ठाकरे, बंडू ठाकरे, रामभाऊ ठाकरे, स्नेहा गावंडे, अश्विन गावंडे, माधव गावंडे, विकास म्हस्के या जखमींना पोलीस आणि नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी हलवलं. घाटीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वाळूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. जो नादुरुस्त कंटेनर दहेगाव बंगल्याजवळ उभा होता त्याला रिफ्लेक्टर किंवा तो नादुरुस्त असल्याचा काहीच दिशादर्शक फलक लावला नव्हता.