Aurangabad Accident News | शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना 13 वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद (Aurangabad Accident News) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेतून घरी जाण्यासाठी सायकलवर निघालेल्या 13 वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कन्नड तालुक्यातील पानपोई फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. (Aurangabad Accident News)

या अपघातात मृत पावलेल्या मुलीचे नाव श्रद्धा सोमीनाथ पिंपळे (Shraddha Sominath Pimple) असे आहे. मृत श्रद्धा पिंपळे हि सातवीच्या वर्गात शिकत होती. घटनेच्या दिवशी श्रद्धा नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ती घरी परत येत होती. पाणपोई फाट्या जवळील बनशेंद्रा शिवारातील बहिरगाव डोणगाव रोडवर शाळेतून सायकलवरून घरी येत असताना अचानक एका भरधाव ट्रॅक्टरने तिला धडक दिली. (Aurangabad Accident News)

या भीषण अपघातात श्रद्धा गंभीर जखमी झाली. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपळे कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Aurangabad Accident News |13 year old girl crushed by tractor collision incident in aurangabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shahid Afridi | होय, मी चीटिंग केली होती ! ‘त्या’ सामन्याबाबत शाहिद आफ्रिदीचा मोठा खुलासा

Pune Crime | पती पत्नीच्या भांडणात गोळीबार, 8 वर्षाची मुलगी गोळी लागून जखमी; नर्‍हेमधील घटना, बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या ताब्यात

Rohit Sharma World Record | हिटमॅन रोहितने नागपूर T-20 मध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड