Aurangabad Accident News | मॉलमध्ये खरेदी करुन परतत असताना दोन जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Accident News | औरंगाबाद एक धक्कादायक घटना घडली असून यामध्ये दोन जिवलग मित्रांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोघे मित्र औरंगाबादेतील मॉलमध्ये खरेदी करून जालन्याला बाईकवरून निघाले होते. यावेळी त्यांच्या बाईकला एका भरधाव ट्रकने धडक दिली आणि हे दोघे ट्रकखाली चिरडले गेले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Aurangabad Accident News)

 

गुरुवारी रात्री लाडगाव – करमाड जवळ हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त भागातील पथदिवे बंद असल्याने गेल्या काही काळापासून लहान मोठे अपघात होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आणि नेमकी हीच चूक ह्या दोघा जिवलग मित्रांच्या जीवावर बेतली. विलास मनोहर पाचीपांडव (वय 28 वर्ष) आणि प्रवीण प्रल्हाद सुरसे (वय 27 वर्ष, दोघे रा. जालना) अशी या अपघातात मृत पावलेल्या मित्रांची नावे आहेत. (Aurangabad Accident News)

हा अपघात घडला तेव्हा हे दोघेजण (एम.एच.21 बिएक्स 5993) या दुचाकीने जालन्याहून खरेदीसाठी औरंगाबादेतील मॉलमध्ये आले होते. मॉलमध्ये खरेदी करून रात्री ते जालनाकडे परत घरी जात होते. यादरम्यान ओरिकसिटीच्या लाडगाव-करमाड शिवेवर असलेल्या प्रवेशद्वारातून जालना महामार्गावरून आलेल्या ट्रकने अचानक टर्न घेतला. त्यामुळे दुचाकीस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी ट्रकच्या मधोमध घुसली आणि हे दोघेजण ट्रकखाली चिरडले गेले. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या दोघांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. या जिवलग मित्रांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Aurangabad Accident News | aurangabad best friends die after truck hit their bike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Pune Pimpri Chinchwad Crime | भागिदार आणि कर्मचाऱ्याकडून कंपनीला 3 कोटींचा गंडा, भोसरी एमआयडीसी परिसरातील प्रकार

Pune Crime News | बेधूंद वातावरणात लोणावळ्यातील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये सुरु होता अश्लिल डान्स ! पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम; 53 जणांवर कारवाई, 9 महिलांचा समावेश