Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट; दुचाकीस्वार गंभीर जखमी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Accident | औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad News) कन्नड येथून वैजापूर कडे जाणाऱ्या एसटीखाली (ST) दुचाकी आल्याने झालेल्या स्फोटात भीषण आग लागल्याची थरारक घटना (Aurangabad Accident) घडली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास वैजापूर जवळ (Vaijapur) रोटेगाव पुलावर घडली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. संजय नारायण पवार (Sanjay Narayan Pawar) (40, कन्नड, वडारवाडा) असं दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समजते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड आगारातून (Kannada Depo) वैजापूरसाठी 1 बस दुपारी रवाना झाली.
यादरम्यान आन्दूरसोल (Andersol) या येवला तालुक्यातील लग्न उरकून संजय पवार कन्नड येथे परतत होते.
यावेळी, वैजापूर जवळील रोटेगाव पुलावर (Rotegaon Bridge) 4.30 वाजेच्या सुमारास ओव्हरटेकच्या प्रयत्नात पवार यांची बाईक बसच्या समोरच्या चाकाखाली आली.
अचानक भरधाव बाईक खाली समोरच्या चाकाखाली अडकल्याने चालकाने ब्रेक मारला.
पण बाईक चाकाखाली फरफटत गेल्याने पेट्रोल टाकी फुटून मोठा स्फोट (Explosion) झाला. (Aurangabad Accident)
दरम्यान, स्फोट झाल्याने बाईक आणि बसच्या समोरच्या बाजूला आग लागली. यावेळी बस चालकाने बस थांबवून प्रवाशांंना माहिती दिली.
बसमधून प्रवाशांना उतरवण्यात आले. त्यानंतर क्षणार्धात बस आणि बाईक आगीत खाक झाली.
संजय पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (Aurangabad Government Hospital) उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. दरम्यान, बसमधील सर्व 45 प्रवासी सुखरूप असल्याची माहीत आहे.
Web Title :- Aurangabad Accident | thrilling the petrol tank of the bike stuck under the bus exploded bus bike and burn
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update