Lockdown : कार घेण्याचं ‘स्वप्न’ पूर्ण होणार, 5 हजाराचा ‘चेक’ आणा आणि ‘कार’ घेऊन जा, कंपन्यांची दमदार ‘ऑफर’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या राज्यात आणि देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सर्व उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले आहे. लॉकडाऊनचा फटका इतर उद्योगांना बसला आहे तसा वाहन उद्योगालाही याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कार कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या दमदार ऑफर दिल्या आहेत.

टाटा कंपनीने ग्राहकांना एक चांगली ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 5 हजार रुपयात कार मिळणार आहे. 5 हजाराचा चेक आणा आणि 5 लाखापर्यंतची कोणतीही कार घरी घेऊन जा अशी ऑफर टाटा कंपनीने ग्राहकांना दिली आहे. या शिवाय पहिले सहा महिने ग्राहकांना केवळ 5 हजार रुपयांचा हप्ता भरायचा आहे. सहा महिन्यानंतर ग्राहकाला त्याच्या हप्त्याची रक्कम ठरवून दिला जाणार आहे.

एवढेच नाही तर जर तुम्हाला कर परत करायची असेल तर ती परत ही घेऊ असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुळे कार बाजारात असलेली अस्थिरता दूर करण्यासाठी आता कार कंपन्या मैदान उतल्याचे पहायला मिळत आहे. कार कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना कार घेणे परवडणारं नाही. परंतु अशा प्रकारची ऑफर टाटा कंपनीने सुरु केल्याने सामान्य माणसाचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

टाटा कंपनीने केवळ 5 लाखा पर्यंतच्या कारच नाही तर इतर कारला देखील ऑनरोड किमतीचं कर्ज देण्याची सुविधा दिली आहे. पूर्वी कर्जाचा हप्ता 5 वर्षाचा असायचा त्यामुळे ग्राहकांना महिन्याचा इएमआय हा जास्त भरावा लागत होता. आता ग्राहकांना मासिक इएमआय कमी व्हावा यासाठी गाडीचं कर्ज 8 वर्षापर्यंत फेडता येईल अशी नवीन योजनेत ऑफर देण्यात आली आहे.