विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल केली होती.

सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती. कुठल्याही इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. मात्र हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून, दबाब टाकून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली असं याचिकेत म्हटलं आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र यामध्ये कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे रजाभाऊ फड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

धनंजय मुंडे सर्वोच्च न्यायालयात जाणार –

मात्र सदर जमिनीच्या ७/१२ वर जमीन इनाम असल्याचा कुठेही उल्लेख नसल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

You might also like