Coronavirus : औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेची यशस्वी डिलिव्हरी, गोंडस मुलीला दिला जन्म

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  येथील घाटी रुग्णालयात एका कोरोना संसर्गित महिलेची प्रसूती यशस्वीरीत्या झाली असून तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बाळ व बाळाची आई दोन्ही सुखरूप आहे. नवजात शिशूचे स्वॅबचे नमुने घेऊन ते चाचणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरोदर महिला कोरोना संसर्गित असल्याने तिची प्रसूती करणं डॉक्टरांसमोर एक मोठं आव्हान होत. मात्र, कोरोना विरुद्ध लढा देणारे डॉक्टर आणि नर्सने नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेची प्रसूती शस्त्रक्रिया पद्धतीने यशस्वी रित्या केली आहे. या महिलेची प्रकृती उत्तम आहे. बाळाचे वजन सव्वा तीन किलो भरले असून ते ठणठणीत आहे. तर नवजात बाळाची कोरोना संसर्गित चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी त्या बाळाचे स्वॅबचे तीन नमुने देखील घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

आई व बाळ क्वारंटाईन

उत्तरप्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका कोरोना संसर्गित महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मागील आठवड्यात शनिवारी या महिलेला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. १६ एप्रिल रोजी कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह असणाऱ्या या महिलेने नंदग्राम येथील खाजगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता. सध्या या महिलेला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं असून, तिच्यावरती उपचार सुरु आहे. दरम्यान, आई व बाळाला देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर बाळाची देखील कोरोना संसर्गित चाचणी करण्यात येणार आहे.