Aurangabad Crime | गुन्हे शाखेची मोठी कारवाई! औरंगाबादमधील पगारिया ऑटोत दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सध्या गुन्हेगारीच्या (Aurangabad Crime) क्षेत्रात मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी एका दरोडा (Robbery) टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गजाआड केले आहे. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
औरंगाबाद मध्ये पगारिया ऑटो (Pagariya Auto) हे सर्वात मोठे वाहन विक्रीचे शोरूम आहे. या शोरूमवर दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीने दरोड्यात 15 लाखांची रोकड लंपास केली होती. या शोरुमचा दरवाजा उचकटून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी या शोरूममधील तिजोरीतून तब्बल 15 लाख रुपये घेऊन पळ काढला.
या दरोड्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली.
यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून तपास करत दरोडा टाकणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक (Arrest) केली आहे. तसेच या आरोपींकडून 4 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Web Title :- Aurangabad Crime | 15 lakh robbery in pagariya auto inter state robs gang arrested aurangabad
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
CBI ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पुण्यातील दूरसंचार विभागातील दोन बडे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात
Adv.Pravin Chavan | अॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द