Aurangabad Crime | धारदार शस्त्राने 18 वर्षीय युवकाची हत्या; धक्कादायक कारण समोर, शहरात प्रचंड खळबळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | महाराष्ट्रात गुन्ह्याचे सत्र अधिकच वाढलं आहे. अगदी क्षुल्लक कारणाने देखील शस्त्राचा धाक दाखवत आयुष्यावर बेतलं जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबाद (Aurangabad Crime) येथे घडली आहे. येथील एका 18 वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. महेश दिगंबर काकडे (वय, 18, रा. नक्षत्रवाडी ) असं खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना रविवारी रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कांचनवाडी भागातील एका वाईन शॉपच्या समोरच्या गल्लीत महेश काकडे (Mahesh Kakade) याचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आला आहे. रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेल्या अवस्थेत स्थानिक नागरिकांनी बघितले. यानंतर जखमी महेश काकडे याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी महेश काकडेला मृत (Died) घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना दारूच्या वादातून घडली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कराडे (API Karade) हे करित असून यासंबंधी प्रत्यक्षदर्शी आणि मृताच्या कुटुंबाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Shiv Sena | महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य; मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षीत शहर

ACP Vijay Chaudhary | ACP आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पै. विजय चौधरी गणरायासमोर ‘बेभान’ होतात तेव्हा… (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Aurangabad Crime | 18 year old killed by sharp weapon in aurangabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update