Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय तरुणीची हत्या (Murder of a 19 Year Old Girl In Aurangabad) करण्यात आल्याची खळबळजनक घटना (Aurangabad Crime) घडली आहे. त्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या (Murder) केल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञातावर पोलिसांकडून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटली असून, अटक (Arrested) करण्यासाठी पोलीस पथक पाठवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयात (Devagiri College) ही विद्यार्थिनी बीए प्रथम वर्षाला (BA First) शिकत होती. धक्कादायक बाब म्हणजे कॉलेजच्या परिसरात आलेल्या एका युवकाने तिला 200 फूट ओढत नेत चाकूने भोसकून हत्या केली आहे. यापूर्वी युवक व विद्यार्थिनीमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान या घटनेमुळे कॉलेजच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Aurangabad Crime)

दरम्यान, एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आरोपीची ओळख पटली असून, पोलिसांचे पथक अटक करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी (Aurangabad Police) दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.

Web Title : Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर