×
HomeशहरऔरंगाबादAurangabad Crime | एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीला दिली जिवे मारण्याची धमकी; होणाऱ्या नवऱ्याला...

Aurangabad Crime | एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीला दिली जिवे मारण्याची धमकी; होणाऱ्या नवऱ्याला दाखविणार होता ‘ते’ फोटो

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | आजच्या पिढीमध्ये नकार पचवण्याची ताकद नाही, अनेकदा तरुणाईत कोणावरतरी प्रेम जडतं, पण त्याला समोरच्या व्यक्तीची स्वीकृती नसते, त्यामुळे ते प्रेम एकतर्फीच राहते. काही जण त्यातून बाहेर पडतात, तर काही या एकतर्फी प्रेमामुळे अनेक विक्षिप्त प्रकार करतात. अशाच एका विक्षिप्त घटनेची माहिती औरंगाबाद (Aurangabad Crime) येथून बाहेर आली आहे.

 

वैभव उत्तम राऊत (रा. वानखेडेनगर, औरंगाबाद) (Aurangabad Crime) या तरुणाची त्याच्या महाविद्यालयात एका तरुणीशी ओळख झाली. दोघेही फक्त मित्र-मैत्रीण होते. तेव्हा त्यांनी एकमेकांबरोबर फोटो काढले. मात्र, नंतर तरुणीचे लग्न ठरले, ही गोष्ट वैभवला सहन झाली नाही. त्याने तिला लग्नाची मागणी घातली, पण तरुणीने वैभवबरोबर लग्न करण्यास नकार दिला. हे वैभवच्या पचनी पडले नाही आणि त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही तरुणी लग्नाला तयार होत नाही हे पाहून त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे आणि स्वतःचे फोटो दाखवण्याची भीती घातली.

 

माझ्यासोबत लग्न कर, नाही तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकेन, अशी धमकी आरोपीने पीडित तरुणीला दिली.
शिवाय, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या दोघांचे काढलेले फोटो पाठविन, अशी धमकीही तो देत होता.
आरोपीने तिच्या बहिणीलादेखील मध्यस्थी बनवले होते. शेवटी पीडितेने औरंगाबादमधील (Aurangabad Crime) सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहे.

 

Web Title :- Aurangabad Crime | aurangabad man blackmails female friend for showing photos clicked together to fiance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर

Must Read
Related News