Aurangabad Crime | औरंगाबाद पोलिसांचा फार्म हाऊसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – Aurangabad Crime | हद्यीतील पिंपळगाव येथे दगडा फार्म हाऊसवर (Dagda Farm House) अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पोलिसांनी छापा टाकून तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी (Aurangabad Police) ही कारवाई पहाटे साडे तीनच्या सुमारास केली. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (SP Manish Kalwania) यांना फार्म हाऊसवर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch (LCB) पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे (Police Inspector Rameshwar Renge), व त्यांच्या पथकाला तात्काळ खात्री करून छापा मारण्याच्या सुचना दिल्या होत्या. (Aurangabad Crime)

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले (Sub Divisional Police Officer Prakash Bele) व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी जाणाऱ्या रोडवर मनोजकुमार दगडा (Manoj Kumar Dagda) यांच्या शिवारातील शेतातील फार्म हाऊसवर पडताळणी केली असता तेथे काही जण पत्त्यांवर पैसे लावुन झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी रात्री 3.30 वाजता मनोजकुमार दगडा यांच्या फॉर्म हाऊसवर अचानक छापा टाकला असता तेथील पहिल्या मजल्याच्या गॅलरीमध्ये झन्ना -मन्ना जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले, पुनमसिंग सुनील ठाकुर
(वय 33, रा. रांजणगाव शेणपुंजी ता.जि. औरंगाबाद), गणेश रावसाहेब पोटे
(वय 28, रा. नागेश्वरवाडी, औरंगाबाद), कुणाल दिलीपकुमार बाकलीवाल (वय 37, रा. शहागंज, औरंगाबाद),
अभिषेक वसंतकुमार गांधी (वय 36, रा. चिकलठाणा औरंगाबाद), संदीप सुधीर लिंगायत
(वय 47, रा. बन्सीलाल नगर औरंगाबाद), विशाल सुरेश परदेशी (वय 33, रा पदमपुरा, औरंगाबाद),
मनोजकुमार फुलचंद दगडा (वय 38 , रा. सिडको एन-ए छायानगर, औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्यांची नवे आहेत. (Aurangabad Crime)

आरोपींच्या ताब्यातुन 25 लाख 60 हजार रुपये रोख तसेच चारचाकी पाच वाहने, 7 मोबाईल हॅन्डसेट,
जुगाराचे साहित्य असा एकुण 1 कोटी 81 लाख 12 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीविरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात (Shillegaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाणे करीत आहेत.

Web Title :- Aurangabad Crime | Aurangabad Police raids a gambling den on a farm house, seizes 2 crore worth of valuables

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे हरणारी लढाई लढताहेत का?

Andheri East Bypoll Election | अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ शिवसेनेच्या पाठीशी, शिंदे गटाला दिले ओपन चँलेंज