Aurangabad Crime | औरंगाबादमध्ये विचित्र घटना, स्वतःला पेटवून घेऊन प्रियकराने मारली प्रेयसीला मिठी

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – एका भांडणानंतर एका प्रियकराने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर प्रेयसीला मिठी मारल्याचा एक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad Crime) घडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr Babasaheb Ambedkar University) परिसरात ही घटना घडली. या घटनेत (Aurangabad crime) दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

हे दोघेही विद्यापीठात झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. गजानन मुंडे (Gajanan Munde) असे युवकाचे नाव आहे.. आज दोघे हे शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था या महाविद्यालयात आले होते, त्यावेळी दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यानंतर प्रियकर गजानन मुंडे याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले आणि प्रेयसीला मिठी मारली.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमध्ये (Aurangabad Crime) दोघे गंभीररित्या गंभीर जखमी झाले आहेत.
दोघांवर घाटी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गजानन मुंडेने असे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

 

Web Title :- Aurangabad Crime | boyfriend sets himself on fire and hugs girlfriend incident in aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना