Aurangabad Crime | डोक्यात फावडे मारून विभक्त पत्नीची हत्या; पैठणमधील घटना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना पैठण शहरात घडली. विभक्त पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात फावडे मारून खून (Aurangabad Crime) केला आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पैठण शहरात मोठी खळबळ उडाली. ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ असे आरोपी (Aurangabad Crime) पतीचे नाव आहे, तर मंदा पुंडलिक पौळ असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पौळ हा वीटभट्टी कामगार होता. मंदा पौळ यांच्यासोबत त्याचे लग्न झाले होते.
दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यांच्यात पटत नसल्याने तीन वर्षांपूर्वी दोघे वेगळे झाले होते.
मंदा मोलमजुरी करून आपला आणि तीन मुलांचा उदरनिर्वाह करत होत्या. या दाम्पत्याला तीन मुले आहेत.
विभक्त झाल्यावरदेखील ज्ञानेश्वर पौळ मंदा यांच्यावर सतत संशय घेऊन त्यांना त्रास देतच होता.
मंगळवारी सकाळी ज्ञानेश्वर पौळ शहरातील नेहरू चौकाकडे निघाला होता. त्याचवेळी मंदा यादेखील कामासाठी निघाल्या होत्या. यावेळी दोघेही समोरासमोर आल्याने ज्ञानेश्वर पौळ याने पुन्हा वाद घालायला सुरुवात केली. या वादात बाजूला सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेला फावडा उचलून ज्ञानेश्वरने तो मंदा यांच्या डोक्यात मारला. यात मंदा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ज्ञानेश्वर पौळ तिथून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस पौळ याचा कसून शोध घेत आहेत.

 

Web Title :-  Aurangabad Crime | divorced wife killed by husband by hitting her head with a shovel police arrived at the scene

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात