औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव अग्रहारकर (Anil Madhavrao Agraharkar) यांनी घरातील जीममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल माधवराव अग्रहारकर यांनी आत्महत्या (Suicide) करण्याच्या अगोदर दोन पानांची ‘सुसाइड नोट’ (Sucide Note) देखील लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी चार व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात (Jawaharnagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Aurangabad Crime)
बांधकाम व्यावसायिक अनिल अग्रहारकर यांचा मित्रविहार कॉलनीमध्ये बंगला आहे. या ठिकाणी ते पत्नी, मुलगा, मुलगी आणि सुनेसह राहतात. घटनेच्या दिवशी सकाळी ते दुसऱ्या मजल्यावरील जिममध्ये गेले होते. मात्र सकाळचे 7.30 वाजले तरी ते खाली आले नाहीत, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी त्यांची पत्नी जीममध्ये आली. तेव्हा अनिल अग्रहारकर यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर त्यांना तातडीने हेडगेवार हॉस्पिटलमध्ये (Hedgewar Hospital) दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. (Aurangabad Crime)
यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता बेडरुममध्ये एक डायरी आढळून आली.
डायरीत अग्रहारकर यांनी आत्महत्या करण्याचे कारण नमूद केले आहे.
कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी आपल्या
डायरीत लिहिले आहे. क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर हे बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य संस्था
‘कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (क्रेडाई) औरंगाबाद शाखेचे
कोषाध्यक्ष होते. त्यांचा चौरंगी हॉटेलच्या जागेवर बहुमजली इमारतीचा प्रकल्प सुरू होता, तसेच साई टेकडीसह
इतर ठिकाणीही त्यांच्या बांधकाम साइट सुरू असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.
Web Title :- Aurangabad Crime | famous builders suicide in aurangabad two page suicide note written
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update