Aurangabad Crime | WhatsApp च्या ‘स्टेटस’वर ‘गुड बाय’ लिहून हिंगोलीच्या उच्चशिक्षीत तरूणाची औरंगाबादमध्ये आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  औरंगाबाद शहरातील (Aurangabad Crime) एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या एका उच्चशिक्षित (Highly educated) तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (commits suicide) केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.20) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला (WhatsApp Status) ‘गुड बाय’ असे लिहून आत्महत्या केली आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील (Aurangabad Crime) भावसिंगपुरा येथील पेठेनगर भागात घडली आहे.

नागेश मधुकर तुरुकमाने Nagesh Madhukar Turukmane (वय-25 रा. पेठे नगर, औरंगाबाद मुळ रा. हिंगोली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
नागेश याने एम.ए पर्यंत शिक्षण घेतले आहे. तो मुळचा हिंगोलीचा (Hingoli) असला तरी तो लहानपणापासून त्याच्या आत्याकडे राहत होता.
नागेशची आत्या मुंबई येथे कामानिमित्त गेली होती. त्यामुळे तो घरात एकटाच होता. मंगळवारी रात्री मुंबईहून रेल्वेने त्याची आत्या औरंगाबादला (Aurangabad Crime) आली.
त्यांनी नागेशला घेण्यास बोलावले. परंतु त्याने मी थकलो आहे, असे सांगितल्याने त्या नातेवाईकांच्या घरी झोपल्या.
पहाटे तीनच्या सुमारास त्याने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (Aurangabad Crime) बदलले. हा मेसेज त्याने त्याच्या मावस भावाला देखील केला होता.

 

पोलिसांनी केलेल्या तपासात नागेशने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ‘गुड बाय’ लिहून घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
सकाळी उठल्यानंतर नागेशच्या मावस भावाने त्याचा मेसेज वाचला. त्यानंतर त्याने आत्याला ही माहिती दिली.
त्यांनी तातडीने घर गाठले तेव्हा घरात नागेश लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
छावणी पोलीस ठाण्यात (chavani police station) अकस्मात मृत्यूची नोंद (Aurangabad Crime) करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Aurangabad Crime | Hingoli’s highly educated youth commits suicide in Aurangabad by writing Good Bye on WhatsApp’s Status

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | …म्हणून पडताळणीचे प्रस्ताव सादर केलेल्यांना जातपडताळणी कार्यालयात प्रस्तावांच्या प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन

Ahmednagar Crime | तोंडात बोळा कोंबून तरुणीचा खून, अत्याचार झाल्याच्या संशयामुळं संपुर्ण नगर जिल्ह्यात खळबळ

Jumbo Covid Hospital Pune | ‘जंबो कोव्हिड हॉस्पीटल ’ बाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेणार – रविंद्र बिनवडे, अतिरिक्त पुणे महापालिका आयुक्त