Aurangabad Crime | अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस ! प्रेयसीच्या पतीचे कंबरेपासून केले दोन तुकडे, औरंगाबादमधील थरकाप उडवणारी घटना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | औरंगाबाद जिल्ह्यामध्ये थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad Crime) शफेपूर (Shafepur) गावात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेयसीच्या पतीचा (Girlfriend’s Husband) निर्घृण खून (Murder) केला आहे. अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) झालेल्या वादातून तरुणाने क्रूरतेचा कळस गाठत साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या पतीचे कंबरेपासून दोन तुकडे (Dead Body Cut Into 2 Pieces) केले. थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात (Aurangabad Rural Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक (Arrest) केली आहे. सुनील हरणकाळ (Sunil Harankal) आणि छोटू मोकशे (Chhotu Mokshe) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संदीप मोकशे (Sandeep Mokshe) असे निघृण खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी आणि मृत व्यक्ती शफेपूर गावाचे रहिवसी आहेत. (Aurangabad Crime)

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मृत संदीप मोकशे याच्या पत्नीचे गावातीलच एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध मागील अनेक दिवसांपासून होते. याची माहिती संदीप याला समजल्यानंतर त्याचे पत्नीच्या प्रियकरासोबत (Boyfriend) जोरदार भांडण झाले. या वादानंतर पत्नीच्या प्रियकराने अनैतिक संबंधाला अडथळा येणाऱ्या संदीपचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने गावातील एका साथिदाराच्या मदतीने संदीप याचा निर्घृण खून केला.

 

नराधम आरोपीं एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मृतदेहाचे दोन तुकडे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या निर्घृण खूनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मृतदेहाची झालेली अवस्था पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास करुन दोघांना अटक केली आहे. पुढील तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Aurangabad Crime | man brutally murdered by wifes boyfriend dead body cut into 2 pieces crime in aurangabad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा