औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Crime News | राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मावस भावाला व्हिडिओ कॉल करून एका 29 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी भागामध्ये हि धक्कादायक घटना घडली (Aurangabad Crime News) आहे. अमोल उत्तम खाडे (वय-29, रा.शाहूनगर, मुकुंदवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मृत अमोल हा रिक्षाचालक होता. तो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. अमोलचे साडेतीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला अडीच वर्षाची एक मुलगीदेखील आहे. मागच्या काही महिन्यांपासून अमोलची बायको माहेरी राहत होती. त्यामुळे तो एकटाच भाड्याच्या घरात राहत होता. घटनेच्या दिवशी अमोलने ज्योतीनगर भागात राहणाऱ्या आपल्या मावस भावाला व्हिडिओ कॉल केला आणि आत्महत्या (Aurangabad Crime News) करीत असल्याचे सांगितले. जेव्हा त्याने व्हिडिओ कॉल केला तेव्हा गळ्यात नायलॉनची दोर होती. यावेळी मावस भावाने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र अमोल ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता.
यानंतर अमोलच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अमोलने आत्महत्या केली होती.
यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्यागोदरच त्याचा मृत्यू झाला होता.
डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमोलने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहेत.
Web Title :- Aurangabad Crime News | 29 year young boy killed himself know in detail
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update