Aurangabad Crime News | मित्रासोबत फोनवर बोलत राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime News | औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठात (National Law University) पाचव्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना समोर आली आहे. युक्ती सुशील बुजाडे Yukti Sushil Bujade (मुळ रा. चंद्रपूर सध्या. रा. मुलींचे वसतिगृह, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. युक्तीने वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. विशेष म्हणजे युक्तीने आपल्या एका मित्रासोबत फोनवर बोलताना हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक (Aurangabad Crime News) माहिती समोर आली आहे. याबाबत सातारा पोलीस ठाण्यात (Satara Police Station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्ती ही विधी विद्यापीठातील पाचव्या आणि शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. ती विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात (Girls Hostel) राहत होती. तीन महिन्यांनी परीक्षा असल्याने ती परीक्षेची तयारी करत होती. मंगळवारी (दि.17) तिचे डोके दुखत असल्याने ती लेक्चरला गेली नाही. मात्र, तिच्यासोबत राहणारी मुलगी लेक्चरला गेली. दरम्यान, तिच्या शेजारच्या खोलीत असलेल्या मुलीला दुपारी युक्ती मित्रासोबत बोलतानाचा आवाज आला होता. बराच वेळ हा आवाज येत होता. पण काही वेळाने आवाज येणं बंद झालं. (Aurangabad Crime News)

युक्तीची रुममेट लेक्चर वरून दुपारी तीनच्या सुमारास आली. तिने खोलीचा दरवाजा ठोठावला मात्र आतून काहिच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे युक्ती झोपली असेल असे समजून ती खाली निघून गेली. काही वेळाने तिने पुन्हा दरवाजा ठोठावला. तेव्हाही युक्तीने दार उघडले नाही. त्यामुळे तिने साडेतीनच्या सुमारास वार्डनला याची माहिती दिली. त्यांनी देखील दरवाजा वाजवला मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर वसतिगृहाच्या वार्डने खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी युक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेबाबत सातारा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
युक्तीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? ती कोणत्या मित्रासोबत फोनवर बोलत होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title :- Aurangabad Crime News | a student committed suicide by hanging herself while talking to a friend on the phone

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

KL Rahul-Athiya Shetty Wedding | लग्नाची तारीख विचारताच अथिया शेट्टीने दिली हि रिअ‍ॅक्शन; Video व्हायरल

PM Narendra Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक; म्हणाले…