Aurangabad Crime News | दारुच्या नशेत महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime News | दारुच्या नशेत महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबाद पोलीस दलातील (Aurangabad City Police) सहायक पोलीस आयुक्त (ACP – Assistant Commissioner of Police) विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर रविवारी (दि.15) विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल (Aurangabad Crime News) करुन त्यांना अटक (Arrest) केली आहे. महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे.

औरंगाबाद शहर (Aurangabad Crime News) पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. तर बुधवार पर्यंत ढुमे यांना निलंबित केले नाही तर शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी दिला होता. त्यामुळे अखेर गृहविभागाने ढुमे यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. तसेच निलंबन असेपर्यंत ढुमे यांना औरंगाबाद शहर पोलिसांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण?

सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मित्र आपल्या पत्नीसोबत त्याठिकाणी आले होते. तिथे दोघांची भेट झाली. ढुमे यांनी आपल्याकडे गाडी नसल्याचे सांगून मित्राकडे लिफ्ट मिळेल का? असे मित्राला विचारले. त्यावेळी मित्राने होकार देत त्यांना आपल्या गाडीत बसवले.

गाडीत बसताना त्यांचा मित्र आणि त्यांची पत्नी पुढच्या सीटवर बसले होते. तर ढुमे मागील सीटवर बसले होते.
दरम्यान, दारुच्या नशेत असलेल्या ढुमे यांनी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली.
महिलेच्या पाठीवरुन हात फिरवायला सुरुवात केली.
त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी वॉशरुमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चल,
अशी विनंती मित्राला केली. तर घरी गेल्यानंतर तुमच्या बेडरुममधील वॉशरुम मला वापरायचे असल्याचे
म्हणत वॉशरुम वापरण्याची परवानगी मागितली. मात्र, तेथेही ढुमे यांनी महिलेची छेड काढली.
तसेच महिलेच्या पतीला मारहाण केली. हा प्रकार शहरातील एका उच्चभ्रू परिसरात शनिवारी (दि.14) मध्यरात्री घडला.

Web Title :- Aurangabad Crime News | aurangabad acp vishal dhume who molested a woman has finally been suspended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद धमकीमुळे मिळालं’ केंद्रीय मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

Satyajit Tambe | सत्यजित तांबे यांना सपोर्ट करणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस