Aurangabad Crime News | आरोपी दिराकडून वहिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Crime News | औरंगाबादमध्ये वहिनी आणि दिराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे यामध्ये आरोपी दिराने मोठ्या भावाची पत्नी वाड्यात सडा टाकत असताना तिचा विनयभंग करीत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपी दीर हा पेशाने वकील आहे. या सगळ्याला विरोध करताना पीडित महिलेने जोरदार आरडाओरड केल्यानंतर आरोपी दिराने तिच्यावर चाकूने हल्ला केला व पसार झाला. या प्रकरणी पोलिसांत वकील दिरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुंडलिकनगर परिसरात 42 वर्षीय पीडित महिला सकाळी सात वाजताच्या सुमारास घरातील वाड्यात सडा टाकत होती. यावेळी या महिलेचा लहान दीर त्या ठिकाणी आला व पीडित महिलेच्या अंगाला झटू लागला. यानंतर त्याने पीडित महिलेला म्हणजेच आपल्या वहिनीला खाली पाडले आणि तिचे कपडे फाडले. यादरम्यान घाबरलेल्या पिडितेने प्रतिकार करीत जोरात आरडाओरड सुरू केली असता आरोपी घाबरला व त्याने चाकूने पिडितेवर हल्ला केला आणि वाड्याचा दरवाजा बंद करून त्या ठिकाणाहून फरार झाला.

यादरम्यान आरोपीने केलेल्या हल्ल्यात पीडित महिलेच्या पायाला जखम झाली.
संध्याकाळी जेव्हा पती कामावरून आले तेव्हा तिने घडलेली सगळी घटना आपल्या पतीला सांगितली.
यानंतर पतीने आणि तिने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी दीराविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title :- Aurangabad Crime News | brother in law molest his own brothers wife in aurangabad