Aurangabad Crime News | परीक्षेच्या तणावातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल; औरंगाबाद हादरलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Crime News | महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या (Maharashtra State Board) परीक्षेला आजपासून (21 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. सर्वत्र विद्यार्थी परीक्षेची (HSC Exam 2023) तयारी करताना दिसत आहेत. या परीक्षेच्या आदल्या दिवशी औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेला अवघे काही तास शिल्लक असताना औरंगाबादमध्ये एका विद्यार्थ्यांने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची खळबजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Aurangabad Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आमन रविंद आहेरेवाल असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो एन 8, सिडको भागातील गुरुनगर हौसिंग सोसायटीमध्ये राहत होता. बारावीची परीक्षा असल्यामुळे आमन आहेरेवाल हा अभ्यास करत होता. रात्री तो नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत अभ्यास करण्यासाठी गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो आपल्या खोलीतून बाहेर आला नाही. (Aurangabad Crime News)

त्यामुळे कुटुंबीयांनी खोलीत जाऊन पाहिले असता धक्काच बसला.
त्यांना आमन गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. यानंतर कुटुंबीयांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आमनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. आमनने परीक्षेच्या तणावातूनच आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांसह नातेवाईकांनी वर्तवला आहे. सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Aurangabad Crime News | dead body of the young man was found in the house after HSC examination

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bela Bose Passed Away | ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन

Nagpur Crime News | मुलीला तिच्या बॉयफ्रेंड बरोबर नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर वडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल