Aurangabad News : डोक्‍यात दगड घालून एकाचा निर्घृण खून

वाळुंजः (जि.औरंगाबाद) :पोलीसनामा ऑनलाईन – अज्ञात व्यक्तीने एका साठ वर्षीय व्यक्तीच्या डोक्‍यात दगड घालून निर्घृणपणे खून केला आहे. बजाजनगर येथील पद्मपाणी बुद्धविहाराच्या गेटमध्ये घडलेली ही घटना शुक्रवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली आहे.

सोमनाथ भुरा राठोड (वय 60, रा.आडगाव (सरक) (ता.जि.औरंगाबाद) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञाताने सोमिनाथ याचा डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर तो तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांनी घटना स्थळी धाव घेतली. श्वानपथकानेही माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमनाथचा मारेकरी कोण व त्याने नेमके कोणत्या कारणावरून खून केला याचा तपास सुरु आहे. दरम्यान पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सूचना केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.