Aurangabad Crime News | धक्कादायक! आईने झोपेतच पोटच्या मुलांचा घेतला जीव; औरंगाबाद हादरलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Crime News | औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये निर्दयी आईने आपल्या पोटाच्या लेकरांचाच जीव घेतला आहे. तिने पोरं झोपेत असताना त्यांचा गळा घोटून जीव घेतला आहे. या प्रकरणी पोलसांनी त्या निर्दयी आईला ताब्यात घेतले आहे. या आरोपी आईने नेमकी कोणत्या कारणामुळे हत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास केला असता दोन्ही मुलांची आई मनोरुग्ण असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी औरंगाबादमधील सातारा पोलीस स्थानकात (Satara Police Station, Aurangabad) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Aurangabad Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?

औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे दोघे बहिण-भाऊ रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन झोपले होते. यानंतर सकाळी ते दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अदीबा फहाद बसरावी, असे 8 वर्षीय मुलीचं नाव आहे. तर अली बिन फहाद बसरावी, असं 4 वर्षीय मुलाचे नाव आहे. (Aurangabad Crime News)

मुलगी अदीबा आणि मुलगा अली रविवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवले आणि त्यानंतर आपल्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी दोघे खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यावेळी त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली असता ते दोघेही बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी डॉक्टरांनी मुलांना मृत घोषीत केलं. यानंतर पोलिसांनी या प्रकारचा कसून तपास केला असता दोन्ही मुलांच्या जन्मदात्या आईनंच रात्री मुलांची गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे. तिची कसून चौकशी सुरु असून तिने आपल्या मुलांचा खून नेमका कोणत्या कारणामुळे केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title :-Aurangabad Crime News | mother killed two children accused woman in police custody

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chinchwad Bypoll Election | सहानुभूती आणि राजकारण वेगळं, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार; नाना काटेंची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Aaron Finch | ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा