Aurangabad Crime | आईसमोर मित्र वाईट बोलल्यामुळं भर रस्त्यात मित्राचा सपासप वार करुन खून

औरंगाबाद न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  औरंगाबादमध्ये एका सराईत गुन्हेगाराने आपल्याच मित्राचा भर रस्त्यात चाकूने वार करुन खून (Aurangabad Crime) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईसमोर मित्र वाईट बोलल्यानं सराईत गुन्हेगाराने मित्राचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि.22) रात्री दहाच्या सुमारास औरंगाबाद शहरातील (Aurangabad Crime) संजयनगर परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्यातील (Jinsi Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन रात्रीच अटक केली आहे.

मंगेश दिनकर मालोदे Mangesh Dinkar Malode (वय-28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तर शेख अरबाज उर्फ विशाल शेख अहमद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे (Accused arrest) नाव आहे.
आरोपी सरईत गुन्हेगार आहे. मंगेशने आई समोर शिविगाळ केली त्यामुळे आरोपीने त्याच्या डव्या हातावर, पायाच्या मांडीवर चाकूने सपासप वार केले.
यात चाकूचे घाव खोलवर गेल्याने मंगेश जागीच कोसळला.

जखमी मंगेश याला नागरिकांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरु असतानाच अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मध्यरात्री एकच्या सुमारास मंगेशचा मृत्यू झाला.
मृत मंगेश नेमक्या कोणत्या कारणावरुन अरबाजला आईसमोर शिवीगाळ केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जिन्सी पोलिसांनी आरोपी अरबाजला अटक केली असून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. पुढील तपास जिन्सी पोलीस करीत आहेत.

Web Title : Aurangabad Crime | speak bad in front of mother man stabbed friend with sharp knife in aurangabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | 10 ग्रॅम गोल्डच्या रेटमध्ये आज पुन्हा झाली घसरण, जाणून घ्या किती स्वस्त झाले सोने?

Raigad Landslides | रायगड जिल्हयात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू, ढिगार्‍याखाली 30 हून अधिकजण अडकल्याची भीती – जिल्हाधिकारी निधी चौधरी

Osmanabad Accident | तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात 4 जागीच ठार