Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद (Aurangabad) येथील लष्करी छावणीतील (military camp) मैदानावरील झाडाला गळफास घेत एका जवानाने आत्महत्या (Crime) केली. रविवारी (दि. 18) पहाटे साडेपाच वाजता जेव्हा अन्य जवान मैदानावर आले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. मल्हार वन्नन राममुर्ती (वय-२६, रा. कृष्णगिरी, तामिळनाडू) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात (Aurangabad Crime) खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मल्हार राममुर्ती (Malhar Rammurthy) हे पाच वर्षापूर्वी लष्करात भरती झाले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी ते औरंगाबादेतील छावणीत दाखल झाले होते. अविवाहित असल्याने ते मित्रांसोबत राहत होते. इतर सहकाऱ्यांसोबत त्यांनी शनिवारी संध्याकाळी जेवन केले.नेहमीचे रुटिग त्यांनी केले. आणि सर्व जण झोपी गेले. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी सरावासाठी अधिकारी आणि जवान मैदानावर जाण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा राममूर्ती हे 169 ऑफिसर मेसच्या बाजूच्या बरॅकजवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

यामुळे एकच खळबळ उडाली. सुभेदार पोपट जाधव व इतरांनी तत्काळ राममूर्ती यांना घाटी
रुग्णालयात (ghati hospital aurangabad) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत
घोषित केले.या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात (chavani police station) आकस्मात मृत्यूची
नोंद करण्यात असून अधिक तपास सहाय्यक फौजदार भगवान वाघ करत आहेत दरम्यान, लष्कराने
पार्थीव ताब्यात घेऊन कृष्णगिरीकडे रवाना झाले आहेत.

हे देखील वाचा

Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Aurangabad Crime | suicide strangulation soldier in chawni area of aurangabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update