Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह (Corpses) आढळून आल्याने शहरात मोठी एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्याची हत्या केल्यानंतर आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाले आहेत. हा प्रकार शहरातील पुंडलिकनगर येथे आज सकाळच्या सुमारास उघडकीस आला. भांडे व्यापारी शामसुंदर हिरालाल कलंत्री (Shamsunder Hiralal Kalantri) (वय, 55) आणि किरण शामसुंदर कलंत्री (Kiran Shamsunder Kalantri) (वय, 45) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, आज (सोमवारी) सकाळी कलंत्री यांच्या घराला कुलूप आहे आणि घरामधून दुर्गंधी येत असल्याची माहिती सविता सातपुते (Savita Satpute) यांनी पोलिसांना (Police) \ कळवली. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्याचबरोबर, मुलगा आकाश (Akash) या घटनेपासून फरार असून त्याचा मोबाईल बंद येत आहे. दरम्यान, मुलाने काॅलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या बहिणीला शनिवारी धुळ्याच्या नातेवाईकांचा अपघात झाला आहे आम्ही तिकडे जात आहोत, तू मावशी सविताकडे जा, असे सांगितले. यानंतर मुलगी तिच्या काकाकडे गेली ही माहिती समोर आलीय. यावरून पोलिसांचं तपासाचे सत्र सुरू आहे. (Aurangabad Crime)

दरम्यान, आई वडिलांचा मोबाईल बंद लागत असल्यामुळे चिंतेने काल दुपारी मुलगी घरी परतली होती. पण दाराला कुलूप असल्याने सविता सातपुते या ओळखीच्या मानलेल्या मावशीच्या घरी राहिली. आज सकाळी ती पुन्हा घरी आली तेव्हा घरातून दुर्गंधी येत होती. यामुळे संविता यांनी पोलिसांना घटना कळविली, पोलिसांनी दार तोडून आत जाऊन पाहिले असता घटना समोर आली आहे.

Web Title : Aurangabad Crime | the dead bodies of the couple were found in the house at pundaliknagar aurangabad crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर