Aurangabad Crime | धक्कादायक ! दिराचा जडला वहिनीवर जीव, पैशांची मागणी करताच केला गेम; औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे एका 28 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Vaijapur Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन पती आणि सासूला ताब्यात घेतले. मात्र, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मयत महिलेचे आणि तिच्या दिराचे अनैतिक संबंध (Immoral Relationship) होते. महिलेने पैशांची मागणी केल्यानंतर दिराने तिचा गळा आवळून खून (Murder) केल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपी दिराला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस (Aurangabad Crime) आला होता.

 

माया आगलावे Maya Aglave (वय 28) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर आरोपी ज्ञानेश्वर आगलावे (Dnyaneshwar Agalave) याला पोलिसांनी ताब्यात (Arrest) घेतले आहे. याबाबत मयत महिलेच्या आईने जावयानेच आपल्या मुलीचा खून केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यावरुन पोलिसांनी पती आणि सासूला ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दिरानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. (Aurangabad Crime)

 

पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरु असताना मृत माया आणि चुलत दीर ज्ञानेश्वर आगलावे यांच्यात अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यातूनच हा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ज्ञानेश्वर आगलावे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांनी त्याला खाक्य दाखवल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. आधी गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

म्हणून केला खून…
आरोपी ज्ञानेश्वर नात्याने मायाचा चुलत दीर लागतो. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणेजाणे होते.
याचदरम्यान चार महिन्यापूर्वी त्यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध (Immoral Love Affair) निर्माण झाले.
मात्र, यानंतर माया सतत पैशांची मागणी करु लागली. यामुळे ज्ञानेश्वर त्रस्त झाला होता.
तसेच पैसे दिले नाहीतर बलात्काराचा (Rape) आरोप करुन समाजात बदनामी करण्याची धमकी मायाने दिली होती.
दरम्यान, सोमवारी (दि.19) मायाने पुन्हा 20 हजार रुपयांची मागणी केली.
मात्र, पैसे नसल्याचे सांगून देखील ती समजून घेत नव्हती.
तसेच तिने पुन्हा बदनामी करण्याची धमकी दिल्याने ज्ञानेश्वरने तिचा गळा आवळून खून केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Aurangabad Crime | wife killed by husband brother murder from a love affair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora | अरहान खानला वाटते आई मलायकापेक्षा ‘ही’ व्यक्ती अधिक जवळची…

MP Supriya Sule | ‘धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे’ – खा. सुप्रिया सुळे

Bank Holidays January 2023 | नवी वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या, जाणून घ्या किती दिवस राहणार बंद