Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गंगापूर तालुक्यात एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुलीला पळविल्याचा आरोप करत काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी एका वृद्ध महिलेला नग्न करत मारहाण केली (Aurangabad Crime) आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओदेखील शूट करण्यात आला. ही चित्रफीत प्रसारित (Aurangabad Crime) करण्यात आली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गंगापूर फाट्यावर पारधी वस्तीत मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासमवेत राहते. ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या मित्रांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुमच्या नातवाने आमची मुलगी पळवून आणल्याचा आरोप केला. त्यानंतर आरोपींनी गंगापूर फाट्यावर त्या वृद्ध महिलेला त्यांच्यासोबत बळजबरीने नेले आणि तिला विवस्त्र करून मारहाण केली. त्यांनी या मारहाणीचा व्हिडिओ शूट केला आहे. आणि तो प्रसारितदेखील केला आहे. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title :- Aurangabad Crime | woman was stripped and beaten in gangapur aurangabad district maharashtra alleging for kidnapping of girl
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aamir Khan | आमिर खानच्या आयुष्यातील ‘तो’ प्रसंग सांगताना त्याला आश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल
Pune Pimpri Crime | दुधिवरे खिंडीत सहलीतील विद्यार्थ्यांची बस खोल दरीत कोसळली; 3 जण गंभीर जखमी