खरच माणुसकी मेलीये का ? अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी बघ्यांची व्हिडिओत धन्यता

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या रायडर्स ग्रुप चालकाच्या भावालाच अपघात झाल्यानंतर मदत मिळाली नाही. अपघात झाल्यानंतर बघ्यांनी केवळ गर्दी केली. मात्र रुग्णालयात कोणीही नेले नाही. आणि बघ्यांनी केवळ व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली.

दोन दिवसांपूर्वी शहरातील दौलताबाद घाटात शेळके मामा हॉटेल जवळ एक अपघात झाला होता. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान अपघात स्थळी बघ्यांचा जमाव जमला जोता. गंभीर जखमी झालेले तरून बघ्यांकडे मदतीची याचना करत होते. मला रुग्णालयात न्या, मला सरळ करा, माझा पाय आडकलाय. मात्र उपस्थितांनी केवळ बघ्याच्ची भूमिका घेतली. जखमी आवस्थेत पडलेल्या तरुणांचा व्हिडिओ काढण्यात उपस्थितांनी धन्यता मानली. मात्र कोणीही त्यांना रुग्णालयात नेले नाही. त्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

विशेष म्हणजे, अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचे नातेवाईक शहरात रायडर्स नावाचा ग्रुप चालवतात. जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्याचे काम ते करतात. मात्र आज त्यांच्याच भावाला मदत मिळाली नाही. हि अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

Loading...
You might also like