माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज, म्हणाले – ‘मला दानवेंचा जावई म्हणू नका’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे याचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातुन निवृत्त होण्याची घोषणा करत पत्नी संजना जाधव यांना राजकीय वारसदार म्हणून घोषीत केले. आता हर्षवर्धन जाधव यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला असून त्यांनी कुटुंब न्यायालयात संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे. अशी माहिती स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी दिली असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी विनंती करताना म्हटले की, मला भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून संबोधू नका. पत्नी संजना जाधव यांच्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली असल्याचेही जाधव यांनी सांगितले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले की, कौटुंबिक त्रासाला कंटाळलो आहोत, रावसाहेब दानवे यांच्यामुळेही त्रस्त झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांचा काही महिन्यापूर्वी व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले होते की, 26 मार्च 2003 ला संजना यांच्याशी माझा विवाह झाला. नवव्या महिन्यात आदित्य झाला. त्यानंतर संजनानं वैवाहिक संबंध तोडले. ते आजपर्यंत नीट झालेले नाहीत. तिच्या वागण्यामुळे मला मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे मी मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलो. तिला पण नेलं. पण ती यायला तयार नव्हती. त्यामुळे घरात समस्या निर्माण होऊन आई वृध्दाश्रमात निघून गेली. असे हर्षवर्धन जाधव म्हणाले होते.