खळबळजनक ! औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील 27 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजेक्शन घेऊन एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

घाटी रुग्णालयातील एका डॉक्टरने इंजेक्शन घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. दरम्यान या डॉक्टराने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शशाद्री गौडा असं या आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे. 27 वर्षी गौडा हे डॉक्टर घाटी रुग्णालयातच एमडी (मेडिसिन) गोल्ड मेडलिस्ट म्हणून पास आऊट झाले होते. याच रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते जॉईन झाले होते. राहत्या घरी या डॉक्टरांनी इंजेक्शन घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

शशाद्री गौडा हे विभागातील हुशार आणि लाडके डॉक्टर म्हणून घाटी रुग्णालयात परिचित होते. मेडिसिन विभागातील स्नेही डॉक्टर अशीही त्यांची ओळख होती. एवढ्या चांगल्या डॉक्टरने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून ते पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया करत आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/