‘…तर मी जीव देऊन तुम्हाला अडचणीत आणेन’ ! जावई हर्षवर्धन जाधव यांची रावसाहेब दानवेंना जावायाची धमकी

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. जावई हर्षवर्धन जाधव यांनी दानवे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्हीही जगा पुन्हा जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करेल आणि तुम्हाला अडचणीत आणीन अशी धमकी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. जाधव यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून दानवेंना घरचा आहेर दिला आहे.

व्हिडिओत हर्षवर्धन जाधव यांनी मनातील खदखद बोलून दाखवून दानवेमुळेच माजी ही अवस्था झाल्याचा आरोप केला आहे. गेल्या आठवड्यात हर्षवर्धन जाधव यांनी राजकरणातून सन्यास घेतल्यानंतर ते चर्चेत आले होते. त्यानंतर आठवडाभरात यूट्युबवर व्हिडिओ अपलोड केला असून सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत‘तुम्हाला वाटते हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले असून अनेक वरिष्ठ वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारले किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, इतके लक्षात ठेवा’, असा धमकीवजा इशाराच दानवे यांनी जाधव यांनी दिला असून या व्हिडिओने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.