जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ११ जुगारी अटकेत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कन्नड तालुक्यातील अंधानेर फाटा परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी छापा टाकून अकरा जुगाऱ्यांवर कारवाई केली. असून त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेख मजीद शेख सत्त्तार (रा. नरसिंगपुर), सलीम यसीम पठाण (नितिन नगर), जाकिरअली उस्मानअली खासाब (बंगला कन्नड), रविंद्र तायड़े (रा. शनि मंदिर), शेख अकबर शेख रुस्तम बनशेंद्रा, गिरधारी दिंगबर परदेशी (रा. समर्थ नगर), शेख सद्दाम शेख सलीम (रा. नितीन नगर), अनिल मलकान चव्हाण (रा. हिवरखेड़ा गौ.), जफरअली मकसूद अली गौरीपूरा (रा. बंगला कन्नड), मनोज यशवंत ठाकुर (रा.धुळे), राहुल सोनावणे (रा.धुळे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून यावेळी मोटारसायकल, मोबाइल, जुगार साहित्य, टेबल, रोख मिळून २ लाख ३५ हजार ९०४ मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अंधानेर फाटा येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय माणिकराव आहेर, कर्मचारी कैलास करवंदे, आर.यु. बोंदरे, मयूर पाटील, योगेश ताटे यांनी छापा मारला.