‘दावत’च्या बिर्याणीतून मदरशातील ६७ मुलींना विषबाधा ; दोघींची प्रकृती गंभीर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – येथील पडेगाव मधील मदरशामधील ६७ मुलींना बिर्याणीतून विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेगाव येथे कासंबरी दर्गामध्ये मदरशा चालविला जातो. या मदरशामधील मुलींना दावतसाठी बिर्याणी देण्यात आली होती. ही बिर्याणी खाल्यानंतर मुलींना उलट्या जुलाब होण्यास सुरुवात झाली. त्या मुलींना विषबाधा झाली असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलींना विषबाधा झाल्याचे समजताच त्यांच्या पालकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे तेथे मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक पालक आपल्या मुलीला शोधण्यासाठी धावधाव करत होते. या सर्व मुलींची प्रकृती आता सुधारत आहे. औरंगाबाद पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Loading...
You might also like