Google वरून ‘वेदना’रहित मृत्यूबाबत माहिती घेत होता सुशांत, रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालं नसल्याचं मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हाय प्रोफाइल या प्रकरणात आता मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस समोरासमोर आले आहेत.आत्महत्या आणि हत्येच्या भोवऱ्यात असलेल्या या प्रकरणात दररोज नवीन तथ्य समोर येत आहेत. मुंबई पोलिस आयुक्त परबीर सिंह यांनी मुंबई आणि बिहार पोलिसांमधील सध्या सुरू असलेल्या संघर्षादरम्यान माध्यमांशी संपर्क साधला. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित माहिती देणारे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांत आत्महत्येपूर्वी वेदनाहीन मृत्यूबद्दल गुगलवर शोध घेत असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाशी संबंधित माहिती देताना मुंबई पोलिस आयुक्त म्हणाले की, 14 जून रोजी पोलिसांना सुशांतच्या आत्महत्येची माहिती मिळाली होती. पोलिस सुशांतच्या फ्लॅटवर पोहोचले तोपर्यंत मृतदेह पलंगावर होता. त्यावेळी तेथे असलेल्या सर्व लोकांचे निवेदन घेऊन पंचनामा करण्यात आला. फ्लॅटचे कुलूप तोडणाऱ्या व्यक्तीचेही निवेदन घेण्यात आले. 15 जून रोजी फॉरेन्सिक टीमने आत्महत्येच्या या प्रकरणाचा तपास केला. यावेळी 56 लोकांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्यात आली. सर्व मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तपास चालू आहे.

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, तपासणी दरम्यान सुशांतच्या कुटूंबाचे 16 जून रोजी निवेदन नोंदविण्यात आले. त्यावेळी कोणालाही कुठलीही शंका नव्हती. सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना जे विधान केले ते अजूनही आमच्याकडे आहे. परबीर सिंह म्हणाले की, ही सर्व विधाने सुशांतचे दाजी ओपी सिंह यांच्यासमोर नोंदविण्यात आली आहेत. अगदी सर्व विधानांवर प्रत्येकाची सही आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आम्ही 13 आणि 14 जूनचा सीसीटीव्ही पाहिला आहे. आम्हाला कोणत्याही पार्टीसंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही.

रियाच्या खात्यात ट्रान्सफर झाले नाहीत पैसे

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, जोपर्यंत दिशा सालियानच्या मृत्यूचा प्रश्न आहे, तर तिचा मृत्यू 8-9 जून रोजी झाला होता. त्या रात्री दिशा तिच्या मैत्रिणीसमवेत होती. तिने रात्री दरवाजा बंद केला आणि नंतर तिचा मृतदेह इमारतीच्या खाली आढळला. दिशाच्या मृत्यूवर कुटुंबाला कोणतीही शंका नाही. यावेळी पोलिस आयुक्तांनी हा धक्कादायक प्रकार सांगितला की सुशांतसिंह राजपूत गूगलवर वेदनारहित मृत्यूबाबत शोधत होता. त्याच्या खात्यात 18 कोटी रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यापैकी 4.50 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु रियाच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाले नाहीत.

बिहार पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित

माध्यमांशी बोलताना पोलिस आयुक्त परबीर सिंह यांनी बिहार पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार नाही. दरम्यान, आम्ही बिहार पोलिसांच्या तपासाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. ते म्हणाले, ‘आमची तपासणी योग्य दिशेने जात आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी कोणावरही शंका घेतलेली नाही.