Aurangabad News | PhD साठी विद्यार्थ्यांकडून मागितली 25 हजाराची लाच; विभागप्रमुख डॉ. उज्वला भडंगे तडकाफडकी निलंबित

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad News | औरंगाबाद शहरातील (Aurangabad News) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada Vidyapeeth) पीएचडीसाठी (Ph.D) पैसे मागितल्याच्या कारणावरून विभागप्रमुखांना तडकाफडकी निलंबित (Suspended) केलं आहे. ‘संशोधन करायचे गाईडला 25 हजार द्या’ अशा आशयाच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपनं शहरात खळबल उडाली आहे. याबाबत कुलगुरू, पोलिसांकडे तक्रार केली असता कुलगुरुंनी शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला भडंगे (Dr. Ujwala Bhadange) यांना निलंबित केलं आहे.

 

एक प्राध्यापिका संशोधक विद्यार्थिनीला प्रति विद्यार्थी 25 हजार (25 thousand bribe) आता आणि तेवढेच पैसे वायवाच्या वेळी गाईडला द्यावे लागतील,
असे म्हणून पैसे आणून देण्याची मागणी करत असल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर चांगलीच प्रसारित झाली आहे.
शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून गाईडसाठी संशोधक विद्यार्थिनीकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.
या सर्व प्रकरणामध्ये विद्यार्थी संघटनेकडून कुलगुरूकडे आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये (Begumpura Police Station) तक्रार दाखल करण्यात आली होती. (Aurangabad News)

दरम्यान, सदर क्लिपमधील संवाद हा शिक्षणशास्त्र विभागाच्या डॉ. उज्वला भडंगे आणि याच विद्यापीठात पीएचडी करणारी विद्यार्थिनी अंजली घनबहाद्दर (Anjali Ghanbahaddar) यांचा आहे.
प्राध्यापिका उज्वला भडंगे यांनी आपल्याला पीएचडी करायची असेल तर 25 हजारांची लाच द्यावी लागेल आणि त्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप अंजली घनबहाद्दर यांनी केला आहे.
यानंतर कुलगुरूंकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून उज्वला भडंगे यांना निलंबित केलं असल्याचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (Vice Chancellor Dr. Pramod Yewale) यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Aurangabad News | if you want to do phd give 25 thousand to guide conversation clip goes viral after complaint to vice chancellor hod Dr. Ujwala Bhadange suspended

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा