Aurangabad News | अतिक्रमण काढण्याचा हलगर्जीपणा भोवला; मनपा अधिकाऱ्यांना कोर्टाने ठोठवाला दंड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad News | औरंगाबाद हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आहे. परंतु दिवसेंदिवस अतिक्रमणाचा मुद्दा हा गंभीर बनत चालला आहे. औरंगाबाद खंडपीठाकडून वारंवार आदेश देऊन देखील अतिक्रमण काढण्याबाबत हलगर्जीपणा करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक वॉर्डासाठी विशेष अधिकारी नेमूनही परिस्थितीत कोणताही फरक पडला नसल्याने खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी पाच वॉर्डची जबाबदारी असलेल्या विशेष अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. औरंगाबाद शहरातील एन-1, एन-3, एन-6, एन-8 आणि एन-11 या अतिक्रमण असलेल्या वॉर्डाची जबाबदारी असलेल्या विशेष अधिकाऱ्यांवर प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड त्यांच्या वेतनातून उच्च न्यायालयात भरण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यानंतरही यात सुधारणा झाली नाही, तर अधिक कठोर कारवाई करण्याचा इशाराही या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. (Aurangabad News)

औरंगाबाद खंडपीठाने शहरातील सिडको भागातील मोकळ्या जागांवर झालेल्या अतिक्रमणांची दखल घेत, ती हटविण्यासंदर्भात वेळोवेळी सुनावणी घेऊन आदेश दिले आहेत. याशिवाय औरंगाबाद खंडपीठाने वकिलांची एक समितीही नियुक्त केली जी अश्या अतिक्रमणांची नेमकी स्थिती समजून घेईल . खंडपीठ नियुक्त न्यायालयीन मित्र ॲड. अभय ओस्तवाल यांनी पाहणी करून तयार केलेला अहवाल सुनावणीदरम्यान खंडपीठात सादर केला.त्यांनी सुनावणीदरम्यान विविध 40 छायाचित्र खंडपीठात सादर केले. (Aurangabad News)

अनेकदा सूचना देऊन देखील महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याबाबत कोणतीही हालचाल न दाखवल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे यावेळी खंडपीठाने महापालिकेला अतिक्रमाणाचा विषय गंभीरतेने घ्यावा, तसेच अशीच वर्तणूक राहिली
तर सात दिवस हर्सूल कारागृहात पाठवावे लागेल, अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान महानगरपालिकेचे वकील जयंत शहा यांनी नोटीस बजावण्याची विनंती केली होती.
त्यावर आधी खूपवेळा नोटीस बजावली असून आता हे प्रकरण नोटीसच्या खूप पुढे गेले असल्याचं खंडपीठ म्हणाले.

Web Title :- Aurangabad News | the court imposed fine of ten thousand on authorities of aurangabad municipal corporation for not removing the encroachment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Koregaon Crime News | सोने घडवण्याच्या बहाण्याने ३१ लाखांचा ऐवज घेऊन कारागीर फरार; कोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेचा विनयभंग करत वडिलांना मारहाण, आरोपीला अटक; चाकण परिसरातील घटना