Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या मराठवाड्यात बुधवारी (दि. 9) रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात ही घटना घडली आहे. तर याच तालुक्यात वीज पडल्याने 10 शेळ्या तर 2 गायी दगावला आहेत.

औरंगाबाद Aurangabad जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये रात्री वादळी वारा अन् विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक गाव शिवारात पावसाचे पाणी आले होते. फुलंब्री तालुक्यात वीज कोसळल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच याच तालुक्यात 2 दुचाकीस्वार पुलावरून वाहून गेेले होते. मात्र त्यांना गावकऱ्यांनी वाचवले. गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यात आजही ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Burglary in Pune : पुण्याच्या चतुःश्रृंगी, खडकी आणि हडपसर परिसरातील 3 फ्लॅट फोडले, चोरट्यांकडून 8 लाखाचा ऐवज लंपास

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

Crime in Pimpri Chinchwad | ‘दादागिरी’ करण्यासाठी चिंचवडमध्ये टोळक्याकडून तोडफोड, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 जणांना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Wab Title : Aurangabad News | Woman killed, 1 seriously injured in power outage in Aurangabad