औरंगाबाद पालिकेचे पाच लाख लिटर पाणी चोरीला, गुन्हा दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

औरंगाबाद महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून पावणेपाच लाख लिटर पाणी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान मुकुंदवाडी एन-दोन सेक्टर येथे उघडकीस आला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c025ebdc-9ee5-11e8-bf4e-4b9b019f64d8′]

याप्रकरणी संशयित आरोपी बाबुराव खरात, देवराव जोगदंड, गौतम जाधव; तसेच एका महिलेविरुद्ध चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  याप्रकरणी महापालिकेचे दुय्यम आवेक्षक माणिक दगडूजी गोरे यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून पाण्याची गळती होत असल्याची माहिती गोरे यांना मिळाली होती. त्यांनी पाहणी केली असता या जलवाहिनीमधून अनाधिकृत नळ कनेक्शन घेण्यात आल्याचे दिसून आले. गेल्या महिन्याभरापासून हा प्रकार सुरू होता. यामध्ये महापालिकेची सहा हजार रुपये पाणीपट्टी भरेल असे पावणेपाच लाख लिटर पाणी चोरल्याचे दिसून आले; तसेच महापालिकेची जलवाहिनीचे फोडल्याने ५० हजार लिटर पाण्याचे देखील नुकसान करण्यात आले. याप्रकरणी जमादार काटकर तपास करीत आहेत.