औरंगाबाद हिंसाचारात जखमी झालेले ACP कोळेकर यांची प्रकृती चिंताजनक

औरंगाबाद : वृत्तसंस्था
औरंगाबाद शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनच्या वादातून झालेल्या दंगलीवर नियंत्रण मिळवताना गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. कोळेकर यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनधिकृत नळ कनेक्शनवरुन औरंगाबादमध्ये शुक्रवारी दंगल उसळली होती.

या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगड फेक करण्यात आली होती. यामध्ये कोळेकर जखमी झाले आहेत.
नळ कनेक्शन तोडण्यावरुन शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास दोन गटात बाचाबाची होऊन त्याचे रुपांतर दंगलीत झाले. या घटनेची माहिती मिळताच दंगलीवर नियंत्रित करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर आणि त्यांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये कोळेकर यांच्या स्वरयंत्रणेच्या हाडाला जबर मार लागल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

औरंगाबाद येथील शहागंज परिसरात दंगल उफाळली आहे. दंगेखोरांनी परिसरात मोठ्याप्रमाणात जाळपोळ केली आहे. दगडफेकीत पोलीस कर्मचा-यांसह बरेच नागरिक जखमी झाले आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू केली असून जालना येथून अधिक पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला आहे. शहरात सोशल मिडीयातून अफवा पसवण्यात येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाप्रशासनाने शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

संबंधित घडामोडी:
दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांचा औरंगाबादेत हवेत गोळीबार
औरंगाबादमध्ये रात्रभर हिंसाचार
अाैरंगाबाद हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस