पर्दाफाश ! 2 पोते ‘कंडोम’, 7 महिला अन् फक्त 3 ‘कस्टमर’, 10 जण ‘गोत्यात’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूज एमआयडीसी पोलिसांनी वडगाव (कोल्हाटी) येथील एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये सेक्स रॅकेट चालविणार्‍या महिलेसह 6 युवती आणि 3 कस्टमरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून किरकोळ रक्कम म्हणजेच 5 हजार 910 रूपये आणि तब्बल 2 पोते कंडोम जप्त करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांना हा छापा टाकला होता. छाप्यादरम्यान 2 पोते कंडोम आढळुन आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना वडगाव (कोल्हाटी) येथील अण्णा भाऊ साठे चौकाजवळ सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती शनिवारी मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, पोलिस कर्मचारी वसंत जिवडे, रामदास गाडेकर, वसंत शेळके, फकीरचंद फडे, कयुम पठाण, प्रदीप कुटे, बंडू गोरे, सतवंत सोहळे, कोलिमी मनमोहन, गायकवाड प्रकाश, सुधीर सोनवणे, मतलबे दीपक आणि शेख नवाब यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी 3 ग्राहकांसह सेक्स रॅकेट चालविणारी महिला आणि इतर 6 युवती तेथे आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. छाप्यादरम्यान 2 पोते कंडोम आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.