Aurangabad – Pune Expressway Project | नितीन गडकरी यांची मोठी घोषणा ! औरंगाबाद ते पुणे हे अंतर अवघ्या सव्वा तासात पूर्ण करता येणार; एवढा खर्च अपेक्षित

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री (Union Minister of Roads and Transport) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच औरंगाबाद ते पुणे एक्सप्रेस हायवे (Aurangabad – Pune Expressway Project) होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे औरंगाबाद ते पुणे हा प्रवास सुखकर होणार आहे. या नव्या मार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर अवघ्या सव्वा तासात पूर्ण करता येणार आहे. नितीन गडकरी यांनी औरंगाबाद मध्ये 5 हजार 570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचं (Road Project) लोकार्पण केलं. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. (Aurangabad – Pune Expressway Project)

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, औरंगाबाद ते पुणे एक्सप्रेस महामार्गावर 140 किमी वेगाने प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते अमेरिकेच्या स्टँडर्डसारखे असतील असं आश्वासनही गडकरी यांनी दिले. आज औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग (Aurangabad National Highway) क्रमांक 52 औरंगाबाद ते तेलवाडी (Telwadi) या 3062 कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगर नाका (Nagar Naka) ते केंब्रिज स्कूल (Cambridge School) या 73 कोटीच्या 14 किमी रस्त्याचं लोकार्पण करण्यात आले. यासह राष्ट्रीय महामार्ग 752 लेन पेव्हड शोल्डर बीटी रोड (Lane paved shoulder BT road) या 181 कोटींच्या 29 किमी रस्त्याचे देखील लोकार्पण करण्यात आले. (Aurangabad – Pune Expressway Project)

औरंगाबाद ते पुणे हे सध्या 225 किमी असणारे अंतर प्रस्तावित नवीन एक्सेस कंट्रोल महामार्गामुळे (Access Control Highway) केवळ सव्वा तासात पूर्ण करता येईल. आज गडकरी यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजनही पार पडले. यावेळी औरंगाबाद ते पैठण या 1670 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 42 किमी रस्त्याचे चौपदरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग 750 विभागातील चिखली दाभाडी तळेगाव या 37 किमी काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) उपस्थित होते.

Web Title : Aurangabad – Pune Expressway Project | Union Minister of Roads and Transport nitin gadkari announces aurangabad to pune express highway project

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FIR