शिवसेना आमदाराला ‘ते’ प्रकरण पडले महागात; न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा अन् दंड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना Shiv Sena आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2018 मध्ये क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री जाऊन त्यांनी ठाणे अंमलदारासमोरची काच फोडली होती, खुर्ची फेकली होती. या प्रकरणात त्यांना तीन दिवस न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती.

Video : ‘महाविकास’ सरकारमधील नेत्यांवर भडकले फडणवीस, म्हणाले – ‘ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते’

या प्रकरणी शिवसेना Shiv Sena आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस.एम. भोसले यांनी जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास शिक्षेत एक महिन्याची वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण ?
11 आणि 12 मे 2018 रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी गांधीनगर येथील दोन तरुणांना अटक केली होती. याविषयी माहिती मिळताच आमदार प्रदीप जैस्वाल हे रात्री अकराच्या सुमारास पोलीस ठाण्यात गेले. यावेळी ठाणे अंमलदार म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पोटे खुर्चीवर बसले होते. यावेळी ते गांधीनगर येथील आरोपींना जामिनीवर सोडा, असे म्हणाले. आरोपींना अटक करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख अकमल आहेत. त्यांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतो, असे पोटे यांनी सांगितले.

सहायक पोलिस निरक्षक शेख अकलम पोलीस ठाण्यात आले आणि यांनी जैस्वाल यांना सांगितले की, गांधीनगर येथूनच दंगलीला सुरुवात झाली आहे. या गुन्ह्याचा तपास करायचा आहे. काही वेळानंतर जैस्वाल यांनी ठाणे अंमलदार पोटे यांना तुम्ही तुमचे काम बंद करा, आताच्या आता तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा, तुम्ही पोलीसवाले शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक करीत आहात. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या पक्षालाच त्रास देत आहेत, असे म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच उद्या शहरात काय घडते ते बघा अशी धमकी दिली.

त्याचवेळी जैस्वाल यांनी पेन स्टॅण्डने टेबल वरील काच फोडली. त्यावेळी त्यांच्यासोबत 8 ते 10 कार्यकर्ते होते. त्यांनी आणि सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर कर्यकर्ते त्यांना घरी घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल पोटे यांनी जैस्वाल यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला.

 

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’