दुर्दैवी घटना : वाळूच्या ट्रॅक्टरखाली चिरडून दीड वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

कन्नड : पोलीसनामा ऑनलाईन – वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडल्याने दीड वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास कन्नड तालुक्यातील रुईखेडा गावात घडली.

साहिल रियाज शेख असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी देवगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरोघात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

रुईखेडा, टापरगाव भागात शिवना नदीतून मोठ्या प्रमाणावर दिवस रात्र वाळूचा उपसा सुरु असतो. अवैध वाळू वाहतुक येथे करण्यात येते. दरम्यान आज सकाळी साहिल शेख याला एका ट्रॅक्टरने चिरडले. माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. देवगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. साहिलचा मृतदेह हतनुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे.