धक्कादायक ! बिस्किटं खाल्ली म्हणून विद्यार्थ्याला ‘रक्तबंबाळ’ होईपर्यंत मारहाण

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शिक्षण संस्थेतील एका मुलाने न विचारता बिस्कीट खाल्ल्याने या विद्यार्थ्याला संस्थाचालकाने प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या मुलाचे डोके फुटले आहे. निरंजन सतीश जाधव असे या मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

या मारहाणप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संस्थाचालक महाराज रामेश्वर पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी चालू आहे. पाच रुपयाच्या बिस्किटाच्या पुड्यासाठी या महाराजाने त्या निष्पाप मुलाला जीवघेणी मारहाण केली. हा अत्यंत घृणास्पद प्रकार असून या महाराजाने या विद्यार्थ्याला वायरने डोके फुटेपर्यंत मारहाण केली.

दरम्यान, त्यानंतर ही घटना कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी या मुलाचे पालक त्याला भेटायला गेले असताना हा सदर मारहाणीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला उपचारासाठी दवाखान्यात नेले. या मुलाची प्रकृती सध्या स्थिर असून आरोपी संस्थाचालकांची पोलीस चौकशी करत आहेत.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like