अहमदनगर जिल्ह्यातील १६२३ शिक्षकांच्या ऑनलाईन ‘बदल्या’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत शासनाने जिल्हयातील १ हजार ६२३ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्या आहेत. बदली पात्र शिक्षकांनी भरलेल्या माहितीच्या आधारे ‘एनआयसी’ने ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या बदल्या झालेल्या आहेत.

राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मागील वर्षापासून ऑनलाइन प्रणालीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. ६ ते १३ जून या कालावधीत शिक्षकांना बदल्यांसाठी संगणकीय अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. ऑनलाईन प्रणालीव्दारे जिल्हयातील मराठी माध्यमातील १५८४ तर उर्दू माध्यमातील ३९ अशा एकुण १६२३ शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे बदलीचे आदेश राज्य पातळीवरुन निघाले आहेत. ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे आरोप-प्रत्यारोप व आर्थिक उलाढालींना चाप बसला आहे.

सिने जगत –

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’