औरंगाबादमध्ये रस्त्याने चालणार्‍या तरुणाने सोडले प्राण !

पोलिसनामा ऑनलाईन टीम आयुष्य हे क्षणभंगूर असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे काळ कधी आणि कसा आपला घात करेल सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. रस्त्याच्या कडेने चालणार्‍या व्यक्तीला ट्रकने चिरडल्याचा भयंकर प्रकार समोर आला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रुस्तुम लक्ष्मण राजुळे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

काल सकाळी रुस्तुम राजुळे हे बँकेत जाण्यासाठी निघाले होते. रस्त्याच्या एका कडेन चालत असताना अचानक मागून ट्रक आला. त्याने रुस्तुमला धडक दिली. त्यामुळे ते खाली पडल्यामुळे त्यांच्या अंगावरुन ट्रक गेला. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये रस्ता अरुंद असल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औरंगाबादच्या वाळूज परिसरात घटना घडली असून सीसीटीव्हीच्या आधारे चालकाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like